Book Online Tickets for Youtube Masterclass(Marathi)-One day wor, Pune.  
नेटभेट सादर करत आहे मराठीतील पहिला \

Youtube Masterclass(Marathi)-One day workshop

 

Invite friends

Contact Us

Page Views : 76

About The Event

 

नेटभेट सादर करत आहे मराठीतील पहिला "युट्युब प्रशिक्षण वर्ग / Youtube MasterClass"

 

मित्रांनो, युट्युब हे जगातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्च इंजिन आहे. गुगल पाठोपाठ लोक युट्युबमध्ये आपल्याला पाहिजे त्या गोष्टी सर्च करतात. मनोरंजन, शिक्षण, व्यवसाय, कला, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात युट्युबचा भरपूर वापर होतो. असे हे एक अतिमहत्वाचे साधन वापरुन तुम्ही ऑनलाईन जगात बर्‍याच गोष्टी साध्य करु शकता - 
१. तुमचा ब्रँड बनविणे आणि वाढविणे
२. तुमच्या वेबसाईट कडे जास्तीत जास्त ट्रॅफिक वळविणे
३. युट्युब पार्टनर बनून व्हीडीओ मधून पैसे कमावणे
४. तुमचे उत्पादन किंवा सेवांबद्दल माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविणे

 

युट्युबसंबंधी सर्व माहिती PRACTICALLY शिकविणारा हा कोर्स १ ऑक्टोबर २०१७ रोजी (रविवार, सकाळी १०:०० ते ५:००)  कल्याणी नगर, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. 

 

Picture

 

या कोर्समध्ये खालील गोष्टी मराठीतून प्रात्यक्षिकांसहीत शिकविल्या जातील -
१. युट्युब प्लॅटफॉर्मची ओळख
२. युट्युब चॅनेल बनविणे
३. युट्युब पार्टनर प्रोग्राममध्ये भाग घेणे
४. युट्युब व्हीडीओ मधून घरबसल्या पैसे कमावणे 
५. व्हीडीओ बनविण्याच्या विविध पद्धती
६. व्हीडीओ बनविण्यासाठी वापरण्यात येणार्‍या विविध टूल्स आणि सॉफ्टवेअर्सची माहिती
७. व्हीडीओचे सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन
८. व्यवसाय वाढीसाठी युट्युबचा वापर कसा करावा ?
९. ब्रँडींग आणि प्रमोशन साठी युट्युबचा प्रभावी वाप

 

कार्यशाळेची वेळ व ठिकाण - 
दिनांक १ ऑक्टोबर २०१७, वेळ सकाळी १०:०० ते ५:००
कल्याणी नगर, पुणे ​ (पूर्ण पत्ता रजिस्ट्रेशन केल्यानंतर देण्यात येईल)

आम्ही केवळ ट्रेनिंग देऊन थांबत नाही तर तुमचा युट्युब चॅनेल सुरु करण्यासाठी मदत देखील करतो. कोर्स पूर्ण झाल्यानंतर ६० दिवसांच्या आत कधीही एकदा तुम्ही दोन तासांच्या मोफत मार्गदर्शनासाठी (Free Consulting for 2 hours) भेटू शकता. यामध्ये युट्युबसंबंधी तुमच्या अडचणी व प्रश्नांना उत्तरे दिली जातील.



"युट्युब मास्टरक्लास" साठी रजिस्ट्रेशन करु शकता. 
आजच या कोर्समध्ये नाव नोंदवा आणि युट्युबच्या या लाटेवर आरुढ व्हायला सज्ज व्हा !

धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स

 

More Events From Same Organizer

Similar Category Events