Sale Date Ended
गोष्ट इथे संपत नाही....
"लढाई मराठी अस्तित्वाची"
इ. स. 1689 ते 1707
शिवचरित्र हे अवकाशाएवढं विशाल, भव्य आणि अथांग आहे. त्याचा आवाका फार म्हणजे फार मोठा आहे. आपलं दुर्दैव हे की आपण अफजल च्या पोटातून आणि शायिस्तेखानाच्या बोटांतून पलीकडे बघायला तयार होत नाही. हिंदवी स्वराज्याच्या प्रत्येक घटनेत मराठा साम्राज्याची बीजं आहेत. महाराजांच्या व्यक्तिमत्वातले जे पैलू पुराव्यांतून कळतात, किल्ल्यांतून दिसणार तांत्रिक कौशल्य, दूरदृष्टी दाखवणारे कित्येक पुरावे, निव्वळ चित्रपटाची कथा वाटावी अशा घटना हे सगळं सुद्धा त्याच चरित्राचा भाग आहेत. तर चला आता अशा सगळ्या घटनांविषयी जाणून घेऊयात. चर्चा करूयात. अस्मिताबाजीतून आणि दैवतीकरणातून त्या शुरांची सुटका करून त्यांना मानवी पातळीवर बघुयात. पण ही चर्चा काही संदर्भांचे पाल्हाळ किंवा बोजड शब्दांच्या ओझ्यात दबणार नाही आणि भावनांच्या गोंधळात मुद्दाही हरवणार नाही. सगळ्यांना समजेल अशा सोप्या गोष्टीरुप भाषेत चर्चा स्वरूपातला हा कार्यक्रम आम्ही आयोजिला आहे.
आयोजक: Trekism Adventures And Outdoors
सादरकर्ते: सारंग भोईरकर आणि सारंग मांडके
तारीख: शनिवार 13 एप्रिल 2019
वेळ: संध्याकाळी 6 - 8
स्थळ: Chai Tapri ,Swajos Excellency, 917/19-E, Next to INIFD, Off FC Rd, Near Hotel Rupali, Ganeshwadi, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra 411004
GPS Location - https://g.co/kgs/ezwFG6
मर्यादित 30 जागांसाठी
पूर्वनोंदणी आवश्यक
नोंदणी शुल्क : ₹ 100
Including : Welcome Drink