Book Online Tickets for Public Speaking in Marathi - 8 Sunday Mo, Mumbai. आत्मविश्वास व वक्तृत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळा आयोजन हेतू: आत्मविश्वास एका सक्षम व्यक्

Public Speaking in Marathi - 8 Sunday Mornings

 

Invite friends

Contact Us

Page Views : 87

About The Event

आत्मविश्वास व वक्तृत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळा 

आयोजन हेतू: 
आत्मविश्वास एका सक्षम व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग असतो. आत्मविश्वासाने स्वतः:च्या नजरेत स्वतः:चे महत्व वाढते. त्यामुळे समोरील व्यक्तींवर नैसर्गिकरितीने प्रभाव पडतो. कोणतेही कार्य करताना अनेक सामान्य व्यक्तींच्या मार्गात अडथळे निर्माण करणारी चिंतायुक्त भिती मनाच्या कोणत्याही कोपऱ्यात नसते. इतरांच्या टिकेला व स्तुतीला सारख्याच पद्धतीने सामोरे जाता येते. आत्मसन्मानाचा पायाच आत्मविश्वास असतो. ज्यामुळे आयुष्यभर कोणतेही योग्य कार्य किंवा गोल विविध साध्य केला जाऊ शकतो. 'आपण जीवनात आनंदी होण्यासाठी पात्र आहोत' असा विश्वास निर्माण होतो. आत्मविश्वास असणारी व्यक्ती सहसा स्वत:वर प्रेम करते, अशी व्यक्ती वैयक्तिक आणि व्यावसायिक ध्येय साध्य करण्यासाठी जोखीम घेण्यास तयार असते, आणि आत्मविश्वास असणाऱ्या व्यक्तीचे भविष्यातबद्दल सकारात्मक मत असते. 

सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही तुमचा आत्मविश्वास स्वतः:हून निर्माण करु शकता व कायम ठेवू शकता. कारण आत्मविश्वास कमी वा जास्त असून चालत नाही तर तो योग्य प्रमाणातच असावा लागतो. 

आज बहुतेक जणांना मरणाची जेवढी भीती वाटत नाही तितकी भाषण करण्याची अर्थात सार्वजनिक वक्तृत्वाची वाटते.
 भाषण करणे म्हणजेच सार्वजनिक वक्तृत्व हे एक प्रकारचे आव्हान आहे. 
 जेव्हा आपण एखादे आव्हान स्वीकारतो, तेव्हा कळतनकळत आपण भीतीवर विजय मिळवत असतो. 
 ज्यामुळे आपला आत्मविश्वास अधिक वाढत जातो; आपण स्वत:वर विजय मिळवतो. 
 आपल्यातील धाडस, एकाग्रता व विचारांची योग्य जुळवणी, इत्यादि नेतृव गुण विकसित होत जातात.

प्रशिक्षणक्रम विषय:
• मानवी स्वभाव 
• मन:स्थिती नियंत्रण
• वैयक्तिक संवाद 
• वक्तृत्वाचे फायदे 
• प्राथमिक वक्तृत्व शैली 
• विविध वक्तृत्व पद्धती 
• वक्तृत्व कौशल्य कसे मिळवावे?
• वक्तृत्व कौशल्य कसे वाढवावे?

प्रशिक्षण पद्धत:
• सराव सत्र, व्हिडिओ रेकॉर्डींग व अभिप्राय
• प्रशिक्षण संकल्पना आणि तंत्र सराव
• कौशल्य वृद्धी सत्रे 
• प्रश्नमंजुषा
• होम वर्क

Venue: Mumbai University, Kalina, Mumbai

Dates:
6, 13, 20, 27 Nov. and 
4, 11, 18 , 25 Dec. 2016

Time: 10am to 2pm

Early Bird & group Discount
Up to 2 nominations More than 2 nominations
(INR) (INR)
Till 13 October 5,000 5,500
After 13 October 6,500 6,000
•Service tax @ 15% 

Register now....
Bipin Mayekar 9819001215
Email: myself.bipin@yahoo.co.in
Visit now www.prasannahrd.com

Venue Map